भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आज राज्यात कुठे पडणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातून कधीपासून परतणार पाऊस

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दरवर्षी राज्यात ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी म्हणजे उशिराने दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता आहे.राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला. आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे.

कुठे पडणार आज मुसळधार पाऊस

महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे.

परतीचा मान्सून कधीपासून सुरु होणार
नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. परंतु यंदा उशिराने २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. आता राजस्थानमधून नौखरा, जोधपूरमधून परत जाण्यासा सुरुवात केली आहे. मान्सूनने २०२१ मध्ये ६ ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता. तर २०२२ मध्ये २० सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!