भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यातील निवडणुका होणार की नाही? चंद्रकांतदादांचं मोठं विधान

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील महापालिका निवडणुकांवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका एकत्रच घ्या, असं आव्हानच राज्य सरकारला दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

चंद्रकांत पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग वेळ मागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागतील. तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडणार हे स्वाभाविक आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 18 ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्यात काय निकाल लागतो, ते कळेल. पण निवडणुका लांबतील, असं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!