TET Exam Scam ; लाखो रुपये देऊन धुळ्यातील 1003 तर पुण्यातील 323 उमेदवार उत्तीर्ण, पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून माहिती समोर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। पुणे सायबर पोलिसांकडून सुरु असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राज्यातील 7880 विद्यार्थी बनावट पद्धतीनं उत्तीर्ण झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये हा गैरप्रकार झाला होता. ही परीक्षा 2020 मध्ये झाली होती. 7880 जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यातील (Dhule) आहेत. तर, पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याचं समोर आलं आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याची बाब समोर आली आहे.
2019 च्या परीक्षेत धुळ्यातील 1003 जण पैसे देऊन उत्तीर्ण
टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात 323 अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.
आरोपींवर लाचलुचपतचं कलम लागणार
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत.
जी.ए. टेक्नॉलॉजीचे गणेशनं यांची चौकशी सुरु
जी.ए. टेक्नॉलाजीचे गणेशन हा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलिसांसमोर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी गैरप्रकारातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे.