TET exam scam | 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी केली जप्त,पडताळणी सुरु
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पुणे,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणीची( TET exam scam ) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी जप्त केली आहेत. तर राज्य परीक्षा परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा राज्य परीक्षा परिषदेला मिळाला आहे. आतापर्यंत 2019-20 च्या परिक्षेतली 400 तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. जी ए सॉफ्टवेअर कडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
स्वतंत्र गुन्हे दाखल
2018 च्या टीईटी परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केलाच तपासात उघड झाले आहे. 2018 व 2019-20 अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत. 2018 च्या गुन्ह्या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये 2018 च्या परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
आरोपींकडे चौकशी सुरूच
या घोटाळ्यात ज्या अपात्र उमेदवारांनी पात्र होत दलालांना पैसे दिले आहेत . त्यांनी स्वतः होऊन पुढं येत माफीचा साक्षीदार व्हावे असे आवाहनही पोलिसनाकडून करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यातून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. चौकशी दरम्यान एका आरोपी या घोटाळ्याची पाळंमुळं बिहार पाटण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोगामिंग कोड) छेडछाड करून प्रश्नपत्रिका फोडतात. परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड करून गैरप्रकार केले जातात. असे तपासादरम्यान समोर आले आहे.