भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर होणार?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे(वृत्तसंस्था)। आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम यंत्राऐवजी मतपत्रिकांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी तसे संकेत दिले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट पेपर वापरण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. लवकरच राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विद्याधर अनास्कर यांनी दिली.

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच विरोधक सातत्याने ईव्हीएमच्या वापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. भाजपकडून ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार केले जात असल्याने त्यांना निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळते, असा विरोधकांच्या तक्रारीचा एकूण सूर आहे. त्यामुळे देशात पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतमोजणीची पद्धत सूर करावी, असा अनेकांचा आग्रह आहे. महाराष्ट्रातही आतापर्यंत विरोधकांनी अनेकदा ईव्हीएम मशिनच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सहकारी संस्थांच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करुन महाविकासआघाडी सरकार नवा पायंडा पाडणार का, हे पाहावे लागेल.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. राज्य सरकारने या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही आदेश दिला नसल्याने 250 पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांसह, सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील विविध ६७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यानुसार आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळू शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते.
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!