भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच,15 विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे,वृत्तसंस्था। कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यात आणखी भर पडणार नाही, याची दक्षता शालेय शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच आणि ऑफलाईनच होईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी-बारावीची पटसंख्या 15 असलेल्या ठिकाणी एक स्वतंत्र परीक्षा केंद्र असेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले.

दहावी-बारावीसाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 70 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दीडशेहून अधिक विषयांची आठ माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अडथळा असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी शक्‍यता वर्तविल्याने परीक्षा 4 मार्चनंतर घेण्याचे नियोजन होते. परंतु, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग आता कमी झाल्याने परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्यांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल, निकालास विलंब होऊ शकतो, अशी कारणे बोर्डाने सांगितली आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच परीक्षांचे नियोजन केल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून 15-20 दिवसांत उर्वरित अभ्यासक्रम 100 टक्‍के शिवकून पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी ‘हिंदुस्थानी भाई’सारख्या व्यक्‍तींवर विश्‍वास न ठेवता परीक्षेची तयारी करावी, असे आवाहनही बोर्डाने केले आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी शालेय शिक्षणमंत्र्यांची चर्चा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!