क्राईमबोदवळ

Breaking | बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस हवालदारासह पंटरला लाच घेतांना अटक !

बोदवड, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा | बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्तीच्या विरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी १६ हजार रूपयांची लाच स्वीकारणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला त्याच्या पंटरसह आज रंगेहाथ अटक करण्यात आली असून या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बोदवडमधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात सी फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत नामदेवराव निकम यांनी प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती त्यात तडजोडिअंती १६ हजार म्हणजे चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरवले. दरम्यान, सदरील व्यक्तीस लाच द्यायची नसल्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

दिलेल्या तक्रारीनुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचत तहसील कार्यालयाच्या आवारात हवालदार वसंत नामदेव निकम आणि त्यांचा पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर यांना रंगेहात अटक करण्यात आली. गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!