आर टी ओ अधिकाऱ्यांसह पंटरला ३ लांखांची लाच घेताना अटक
जळगाव येथे संभाजीनगर पथकाची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नवापूर आर टी ओ चेक पोस्ट नाक्यावर नियुक्ती देण्या साठी तडजोडी अंती ३ लाखांची लाच स्वीकारताना प्रादेशिक परिवहन कार्यालयात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावत जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह पंटर ला ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याआ कारवाई मुळे लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हा ५५ वर्षीय पुरुष असून यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून ₹. ३,००,००० /(तीन लाख रुपये) लाचेची मागणी दीपक अण्णा पाटील , प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव. यांनी मागणी करून खाजगी इसम भिकन मुकुंद भावे वय, ५२ वर्ष, खाजगी इसम, ,जळगाव. या पंटर मार्फत लाच स्वीकारली असता RTO दीपक अण्णा पाटील ,वय ५६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ता. जि. जळगाव. पंटर भिकन मुकुंद भावे वय, ५२ वर्ष, खाजगी इसम, रा. आदर्श नगर प्लॉट ,नं ९८ ,जळगाव. यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे एम.आय.डी.सी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई मेहरून तलाव जवळ, फ्लॅट न.३,१० लेक होम अपार्टमेंट , जळगाव या घटनास्थळी करण्यात आली.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्य अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वीच दीपक पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या बदलीनंतर अनेक महिने ते पद रिक्तच होते. आज दिनांक ५ डिसेंबर गुरूवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावत कारवाई केली.
प्रादेशिक अधिकारी दिपक पाटील यांच्या कोल्हापूर,ठाणे, सांगली, नगर येथील घरांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यात अनेक बेनामी संपत्तीसह मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर कारवाई सापळा अधिकारी अमोल धस पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सापळा सहाय्यक अधिकारी- सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर, पो हेकॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे,पोअंम , विलास चव्हाण सचिन बारसे, सी एन बागुल ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा