सात दिवसात दुकानांवर मराठी भाषेत फलक लावा, अन्यथा कारवाईचा इशारा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पुढील ७ दिवसात सर्व गाळे, दुकाने, आस्थापना यांच्यावरील नामफलक पाट्या/फलक ह्या मराठी भाषेत करण्यात याव्यात,अशा सूचना जळगाव शहर महानगरपालिके कडून देण्यात आल्या आहेत. अन्यथा त्यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही महापालिका महसूल आयुक्त धनश्री शिंदे यांनी दिला आहे.
राज्य शासनाने या पूर्वीही अशा सूचना केल्या होत्या. आता जळगाव महानगरपालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन गाळे, आस्थापना, दुकानांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दि. ८ डिसेंबर २०२४ पासून ज्या गाळे, दुकाने व आस्थापना यांच्यावरील फलक / पाट्या मराठी भाषेत आढळून येणार नाही त्यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेचे महसूल आयुक्त धनश्री शिंदे यांनी केले आहे.