अनिल परब यांची ईडीकडून ९ तासांपासून चौकशी, अटकेची टांगती तलवार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्रात एकीकडे एकनाथ खडसेंच्या बंडामुळे राजकीय भूकंप झालेला असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी अद्यापही सुरूच आहे. ही चौकशी संपल्यानंतर अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
अनिल परब यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर २७ मे रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वीच ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ते गेले नाहीत. आज एकीकडे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना दुसरीकडे अनिल परब हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. ही चौकशी संपलेली नाही. आज अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे समर्थक ईडी कार्यालायसमोर जमले आहेत.
आयकर विभाग शोध घेत असताना आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम २०१७ मध्ये सुरू झालं आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी ६ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. तया बांधकामाचा खर्च केबल ऑपरेटर आणि अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाही. त्यामुळेच रिसॉर्टवरून अनिल परब अडचणीत आले.