रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार? काय म्हणतो सट्टा बाजार…
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकतंच रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान १३ मे रोजी पार पडले. आता प्रतीक्षा आहे निकालाची. निकालही ४ जून रोजी लागणार असून निकालाबाबत दावे – प्रतिदावे केले जात आहेत. वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे.आता झालेल्या एकूण मतदानावर रावेर सह जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात आकडे मोड सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धि व अनुभवावर तर्क लावत आहे. कोण निवडून येणार? रावेर लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार निवडून येणार.व जळगाव लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार निवडून येणार.
या सोबत आता जळगाव जिल्ह्यातील सट्टा बाजार ही गरम झाला आहे. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे या उमेदवारावर ३० पैसे, तर महविकास आघाडीचे श्रीराम पाटील या उमेदवारावर ४५ पैशांच भाव ठरला आहे. तर जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ या उमेदवारावर ३५ पैसे, तर महविकास आघाडीचे कारण पवार या उमेदवारावर ५५ पैशांचां भाव ठरला आहे. म्हणजेच सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही जागा भाजप जिंकणार? सट्टा बाजारात जेव्हढा भाव कमी तेवढी त्याची निवडून येण्याची शक्यता जास्त असते.
जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवार जिंकणार?
सट्टा बाजारात रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या भाजपा उमेदवारावर ३० पैशांचा भाव ठरला आहे.म्हणजेच एक लाख रुपये लावले आणि जर ते विजयी झाले तर सट्टा लावणाऱ्याला ३० हजार रुपये मिळतील. आणि जर माविआ उमेदवारावर एक लाख रुपये लावले आणि ते जर विजयी झाले, तर लावणाऱ्याला ४५ हजार रुपये मिळतील. तोच प्रकार जळगाव लोकसभा मतदार संघात असणार. म्हणजेच सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयाचा अंदाज वर्तविला आहे.
काय म्हणतो सट्टा बाजाराचा अंदाज
सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार जवळपास दीड लाखांच्या मतांच्या फरकाने विजयी होतील. तर जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार जवळपास दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील.म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील दोन्ही महायुतीच्या भाजपा उमेदवाराना सट्टा बाजाराने विजयाचा कौल दिला आहे.