भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

वन्यप्राण्यांची शिकार प्रकरणी जळगावात छापा, वन्यजीवांचे अवशेष जप्त

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वन्यप्राण्यांची शिकार करून त्याची तस्कारी केल्या प्रकरणी शहरातील भवानी पेठेतील कोगटा या दुकानावर वनविभागाने छापा टाकून कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव (jalgaon) शहरातून वन्यप्राण्यांची शिकार व तस्कारी होत असल्याची गोपनिय माहिती वनखात्याचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांना मिळाल्याने त्यांनी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून आज मंगळवार २३ ऑगस्ट रोजी भवानी पेठेतील मे. रामनाथ रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात छापा टाकला. या छाप्यात हताजोडी, रानमांजर रंगनी, सियारसिंगी, कासवपाठ, इंद्रजाल, नाग मणके, घुबळ नखे, समुद्रघोडा या वन्यजीवांचे अवशेष जप्त केले आहे.

याप्रकरणी डॉ. अजय लक्ष्मीनाराण कोगटा,वय-५३, रा. जळगाव, चुनीलाल नंदलाल पवार, वय-३०, रा. खेडागाव तांडा. ता. एरंडोल आणि लक्ष्मीकांत रामपाल मन्यार, वय-५४, रा. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक सुदश्रन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडीत, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वनपाल संदीप पाटील, वनपाल योगश दिक्षित, वनरक्षक उल्हास पाटील, प्रशांत सोनवणे, जितेंद्र चिंचोले, अजय रायसींग, संभाजी पाटील, चालक ज्ञानेश्वर पवार याचा समावेश असून पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!