बियर शॉपी वर छापा, अवैध देशी – विदेशी दारू जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बियर शॉपीमध्ये अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा बियर शॉपीवर भडगाव पोलिसांनी छापा मारून २८ हजार रुपये किमतीचा अनधिकृत असलेला दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई २९ जुलै रोजी करण्यात आली.
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा या बियर शॉपीमध्ये अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची माहिती भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे,२९ जुलै रोजी भडगाव पोलिसांनी या बियर शॉपीवर धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीचा विनापरवाना वापरत असलेला अनधिकृत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. संदीप जगदीश पवार (वय २२, रा. रुपनगर, पो. पळासखेडा, ता. भडगाव) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो.हे.कॉ. निलेश ब्राम्हणकर,पो.ना.मनोज माळी, पो.कॉ. प्रविण परदेशी, पो.कॉ. सुनिल राजपुत, पो.कॉ. संदीप सोनवणे आणि ललीत पाटील यांच्या पथकाने केली. या बाबत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी हे करीत आहेत.

