न्हावी बसस्थानक परिसरातील जुगार अड्यावर धाड; आठ जणांवर कारवाई !
फैजपुर ता.यावल (प्रतिनिधी)। शहराजवळच असलेल्या न्हावी गावांतील बसस्थानकाजवळ जुगार खेळला जात असल्याची माहिती वरून फैजपूर पोलीसांनी धाड टाकून मुद्देमालासह आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील न्हावी येथील बसस्थानकाजवळ काही जण जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना मिळाली होती गुप्त माहितीवरुन छापा टाकला असता न्हावी येथील एका गणेश मंडळाच्या आडोशाला जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने आठ जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये हितेश यशवंत चोपडे, अनिल मुरलीधर चोपडे, चेतन ललित झोपे, गिरीश शंकर लढे, लोकेश यशवंत चोपडे, प्रितेश नरेंद्र पाटील, उल्हास विलास चोपडे, प्रवीण काशीराम इंगळे या जणांचा समावेश असून याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील कारवाई स.पो. प्रकाश वानखेडे याच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रोहिदास ठोंबर, स.फौ. अंबादास पाथरवट, विजय पाचपोळे, पोहेकॉ उमेश पाटील, पो.कॉ. वाहेद तडवी, सुरदास यांनी कारवाई केली.