अवैध कत्तलखान्यावर छापा, गोवंश जातीच्या जनावरांचे ६० किलो मांस जप्त, रावेर तालुक्यातील घटना
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे आज दि. १४ मार्च शुक्रवार रोजी एका अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून १२०००/- रुपये किमतीचे ६० किलो मांस सावदा पोलिसांनी जप्त करून शेख नईम शेख अयुब कुरेशी. रसलपुर, ता. रावेर. या आरोपीला अटक केली आहे.
सावदा येथून जवळच असलेल्या रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे आयशा मज्जित च्या बाजूला कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती सावदा पोलिसाना मिळाली होती या आधारे आज १४ मार्च रोजी शुक्रवारी पोलीस पथकाने छापा टाकला यात १२ हजार रुपये किमतीचे ६० किलो गोवश जातीचे जनावरांचे गोमांस या सह वजन काटा, सुरा, रोख रुपये जप्त करण्यात आले.
याप्रकरणी शेख नईम शेख आयुब कुरेशी .वय ४७ वर्ष. रा. रसलपुर ता. रावेर याला अटक करण्यात आली असून सावदा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद नोंदवून सदर आरोपीवर गुनोक्रं ६०/२०२५ महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब) (क), ९, ९(अ), भारतीय न्याय सहीता २०२३ ते कलम ३२५, २७१, ३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम १०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील हे करीत आहे.
ज्या ठिकाणी कत्तलखाना चालू होता ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओपन स्पेस ची जागा आहे की खाजगी जागेवर आहे व हा कत्तलखाना उभारणे पर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले असा संतप्त सवाल गोरक्षकांनी व्यक्त केला आहे. व हा अनधिकृत कत्तलखाना तात्काळ जमीन दोस्त करण्यात यावा व पकडलेल्या आरोपीच्या माध्यमातून गावात व परिसरात अवैद्य सुरू असलेले कत्तलखाने व गौवंश तस्करी याची पाळे मुळे शोधून काढून याचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी गोरक्षकांनी यावेळी केली.
काही दिवसांपूर्वीच याच गावात गौवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना गोरक्षक व पोलीस पाटलावर हल्ला झाला होता. तेव्हाच्या घटनेचा धागा या घटनेशी जोडला जातो का याचाही तपास पोलीस प्रशासनाने करावा अशी मागणी होत आहे. कार्यवाही केलेल्या पथकात यांचा होता सहभाग. सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोकॉ बबन तडवी, पोकॉ मनोज तडवी, चापोकॉ नामदेव कापडे, पोहेकॉ/ संजीव चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांचा पथकात सहभाग होता.