भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईम

झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड, ९ जुगाऱ्यांना अटक, रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पोलिसांनी कारवाई करत अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून ३ लाख ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारात समाधान पाटील यांच्या शेतात झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगार खेळला जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी मिळाली. त्या नुसार कारवाई करत जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत छाप्यात १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख रक्कम, ५ मोटारसायकली, १ रिक्षा आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!