सावाद्यात जुगार अड्ड्यावर धाड, मुख्यसुत्रधाराचे गोडबंगाल काय ? कित्येक वर्षांपासून पोलिस चौकीच्या मागील बाजूस जुगार अड्डा सुरू कसा ? कारवाईचे गुढ काय? परीसरात चर्चेला उधाण !
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा शहरातील बस स्थानकाच्या तथा पोलीस चौकी पासुन २ मिनिटांच्या अंतरावर मागील बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यात मुख्य सूत्रधाराचे काय ? पाणी मुरत तर नाही ना अशी जोरदार चर्चा संपूर्ण रावेर तालुक्यात चर्चिली जात आहे.
सावदा शहरातील बस स्थानक परिसरात तथा पोलीस चौकी पासुन २ मिनिटांच्या अंतरावर मागील बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुगार सुरू होता, विशेष म्हणजे पोलिस चौकीच्या मागील बाजूस अंदाजे ३०० ते ४०० मीटर अंतरावर सुरू असलेल्या अड्ड्यावर रावेर तालुक्यासह मध्यप्रदेश राज्यांतील जुगारी जुगार खेळण्यासाठी येतात. परंतु याची कुणकुण पोलिसांना एवढ्या दिवसांत कशी झाली नाही ? यात मात्र आश्चर्य वाटत असल्याने शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून याप्रकरणात नेमकं गूढ काय ? हा अड्डा पोलिसांच्या मुक संमतीनेच सुरू होता. असे परिसरातील नागरिकांमद्ये बोलले जात आहे.
मुख्यसुत्रधाराची जोरदार चर्चा ?
गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहत पणे पोलिस चौकीच्या मागील बाजूस अंदाजे ३०० ते ४०० मीटर अंतरावर हा जुगार अड्डा सुरू आहे. काही वेळा याची जागा बदलली जात असते. ह्या जुगार अड्ड्याचा मुख्यसुत्रधार हा चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यसुत्रधारावर कारवाई का नाही?
भागिदारांनीच केला भागिदारांचा गेम? जुगार अड्ड्यावर मारामाऱ्या—
गेल्या दोन दिवसांपूर्वी या जुगार अड्ड्यावर भागिदारांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद पोलिस स्टेशन पर्यंत गेल्याने त्या नंतर धाड टाकण्यात आली. भागिदारांनीच भगिदरांचा गेम केल्याची सर्वत्र चर्चा आहे . इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी भागिदारांमध्ये असाच मोठा वाद होऊन एकमेकांची डोके फोडली होती.या बाबत पोलिस स्टेशन पर्यंत वाद गेला होता, अशीही चर्चा आहे.
यात कारवाईत संजय लक्ष्मण चौधरी वय ५०वर्ष, रा. स्वामीनारायण नगर, सावदा. रोहित चंद्रकांत सन्यास. वय २३, रा. आंबेडकर नगर, सावदा. अस्लम रशीद तडवी. वय ४२, रा. काझीपुरा, सावदा. सुनील धनराज चौधरी. वय ४३, रा. भोईवाडा, सावदा. अशोक प्रल्हाद खुर्दे. रा. विवरा, ता. रावेर . संदीप कोळी. रा. कोचूर. विशाल कोळी. रा. सावदा. बबलू कासार . रा. सावदा . ता. रावेर. आणि इम्रान शेख उर्फ इम्मो. रा. बडा आखाडा, सावदा. यांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २५ रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली असून या कारवाईत ११२५० रूपये रोख, चार मोटारसायकली आणि चार मोबाईल असा एकूण अंदाजे २ लाख १२ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.असे असले तरी जुगार अड्ड्याच्या सुत्रधारावर कारवाई झाली नसल्याचे आच्चर्य व्यक्त केले जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा