दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा; तरुण तरुणीं रंगेहाथ ताब्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरातील भुसावळ आणि औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलवर गुरुवारी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकत पोलिसांनी हॉटेलमधून तरुण तरुणींना जोडप्यांना रंगेहात पकडले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून कारवाई शहरात खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन हॉटेलवर सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला आहे. औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर आणि भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने १६ पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.
सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हॉटेल मालकाला बोलाविण्यात आले असून तरुण व तरूणींच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.