रेल्वे ठेकेदाराला ४१ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून भुसावळातील रेल्वे ठेकेदार गौरव अनिल मनवानी याना ४० लाख ९६ हजार ९२० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
श्रीकांत मिश्रा याने स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून गौरव अनिल मनवानी, शांती नगर, भुसावळ. यांच्याकडून लोखंडी सळईचा माल पुरवतो म्हणून आमिष दाखविले. नंतर वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे घेऊन तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपये घेतले. परंतु मनवानी यांना लोखंडी सळईचा माल न देता आणखी पैशांची मागणी केल्यामुळे शेवटी त्यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.