भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुन्हा पाऊस, “या” भागात विजांसह मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला अलर्ट

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतातील हाता तोंडाशी आलेले पिके जमीनदोस्त झाली आहेत.

आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच ता. १२ सप्टेंबर पासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!