महाराष्ट्र

राज्यात पावसाचा अलर्ट, पुढील तीन दिवस बरसणार मुसळधार पाऊस, “या” जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यभरात पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मराठवाडा आणि विदर्भासह अनेक ठिकाणी पुन्हा जोर धरला असून श्री गणेशाच्या आगमन बरोबर पाऊसही पुढील तीन दिवस हजेरी देणार असून राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळं पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात रविवार दि. ८ सप्टेंबर पासून पुढील तीन दिवसांपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे,कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, जळगाव, धुळे, नंदुरबार ,नाशिक या जिल्ह्यातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी,सिंधुदुर्ग ,कोकण,मुंबई,पुणे, घाट माथा येते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार असून वादळ व सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी लगतच्या परिसरात व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार असून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!