राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग आहेत. बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा,गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने हजेरी लावला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे.
कोकण सह बहुतांश राज्यात पावसाचा येलो अलर्ट किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस राज्याला दणका देणार आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिलाय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यात १० मे रोजी सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ,गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ११ मे रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच १२ मे रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही पाऊस पडू शकतो.