भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गेल्या महिन्यात पावसानं राज्यात जवळ जवळ सर्वच भागात हजेरी लावली .त्यातच राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यान वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागात ऑरेंज अलर्ट तर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये अति मुसळधार पावसाचा शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये ही मुसळधार पावसाची शक्यता असून आहे.

कोकणात घाटमाथा इथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार तर मुंबई, पुणे, सातारा पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!