राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. पालघर आणि ठाणे वगळता महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यात पुढील दोन दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.आज मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हायअलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही साधारणपणे ढगाळ आकाश आणि मघेगर्नजसेह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावासाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.