भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरेंची तोफ धडाडणारच ! औरंगाबादेत सभेला परवानगी

औरंगाबाद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला. औरंगाबाद पोलिसांकडे सभेच्या परवानगीचा अर्ज प्रलंबित होता. अखेर आज पोलिसांनी काही अटींसह मनसेला सभा घेण्यास परवानगी दिली. औरंगाबादेतील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं. ३ मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेला अनेक पक्ष आणि संघटनांकडून तिव्र विरोध झाला. अखेर, अटीशर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी काय आहेत अटी?

ही जाहीर सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणेदहा या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ यांच्यात बदल करू नये.

सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि परत जाताना कोणतीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी

सभेसाठी बोलवलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याची आणि मार्ग न बदलण्याच्या सूचना देण्यात याव्यात. त्या वाहनांनी शहरात येताना, शहरात आणि शहराबाहेर जाताना रस्त्यांवरच्या विहित मर्यादेचं पालन करावं.

सभेला येणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार, दुचाकी वाहने किंवा इतर कोणतंही वाहन पार्किंगसाठी नेमून दिलेल्या जागेतच पार्क करावं. त्यासंबंधीच्या सूचना देण्यात याव्यात.

कार्यक्रमादरम्यान कोणतंही शस्त्र बाळगणं, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा त्यांचं प्रदर्शन करून नये. शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये नये.

या सभेच्या सर्व अटी सहभागी होणाऱ्या सगळ्यांना कळवण्याची जबाबदारी ही संयोजकांची असणार आहे

कार्यक्रमासाठी स्वयंसेवक नेमण्यात यावेत. तसंच त्यांची नावं, सभेसाठी औरंगाबादच्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नावं, शहर, गावांना अनुसरून संख्या त्यांचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग. येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही सगळी माहिती पोलिसांना सभेच्या एक दिवस आधी द्यावी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!