ठाण्यातील सभे प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल !
ठाणे, मंडे टू मंडे वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा आयोजित केली. ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सभेसाठी मंचावर येताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा सत्कार केला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी तलवार हाती घेतल्याचं दिसून आलं. सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रमात तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा सत्कार करताना दिलेली तलवार म्यान मधून काढून उंचावून दाखवल्याने भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ व ५ नुसार ठाणे नौपाडा पोलीसांनी केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.