महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे बद्दल खळबळजनक वक्तव्य

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. “मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे” , असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा काही ट्विस्ट येणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी उत्कंठा वाढवणारी अनेक वक्तव्यं केली.

पुढे राज ठाकरे असेही म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि मी एकत्र यायला पाहिजे, असे वाटणे वेगळे आहे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरुन त्यांच्याकडून काही लोक बोलत असतात, सांगत असतात. पण मी काय करणार” असे राज ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणे हा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की, यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे.

तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ जवळचा वाटत नाही. यावर मी काय बोलणार, अशी हतबलता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणे हा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की, यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!