भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

जयपूर, वृत्तसंस्था : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री गेहलोतांनी आज सायंकाळी तडकाफडकी संपूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घेतला आहे. उद्या (ता.21) सायंकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अजय माकन हेसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. गेहलोत यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक आज सायंकाळी बोलावली होती. या बैठकीत संपूर्ण मंत्रिमंडळाचेच राजीनामे त्यांनी घेतले आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात सध्या 21 संख्या असून आणखी 9 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. यात पायलट समर्थक 6 आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सायंकाळी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सरकारी महामंडळांवरील नियुक्त्या याबाबत सोनिया गांधींनी गेहलोत यांना आदेश दिले होते. यानंतर तातडीने पायलट यांना सोनिया गांधींनी भेटीसाठी बोलावले होते. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये स्थान देण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. पायलट यांनी वर्षभरापूर्वी पुकारलेल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. ही आश्वासने मिळाल्यानंतर पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केली होती. आता पक्षाने ही आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!