भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

राकेश झुनझुनवाला हे ६२ वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची सुरूवात केली होती. आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण १०० डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स १५० अकांवर होता, जो आता ६० हजारांच्या स्तरावर आहे.

राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे असंही संबोधलं जात होतं. त्यांनी नुकतीच आपली आकासा एअरलाईन्सही सुरू केली होती. ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या कंपनीनं ऑपरेशन्सला सुरूवात केली होती. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान आकासा एअरलाईन्सनं पहिलं उड्डाण घेतलं होतं. १३ ऑगस्ट पासून अकासा एअरनं अनेक मार्गांवर आपलं उड्डाण सुरू केलं होतं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!