रक्षा खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार
नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री असलेल्या रक्षा निखिल खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पदभार घेतल्यानंतर ट्विट करून याबाबत माहिती दिली त्यात त्या म्हणतात की आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने मी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. देशभरातील खेळाडूंच्या भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. व प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आणि माननीय केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडवीयाजी यांनी आज ह्याच मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.