भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

भारताला वैभवशाली बनवण्याचे काम आजपासून सुरू – सरसंघचालक मोहनजी भागवत

अयोध्या (वृत्तसंस्था)। आज संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली असुन अनेकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले आहे. राम मंदिराची उभारणी होत असताना लोकांचे बलिदान विसरता येणार नाही, आता भारताला वैभवशाली बनवण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताला वैभव संपन्न बनवायचे आहे, स्वावलंबी बनवायचे आहे आणि याची सुरुवात आज अयोध्येतून झाली असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. २० ते ३० वर्षे आम्ही काम केले आणि त्यानंतर आज संकल्पपूर्तीचा आनंद आम्हाला मिळत आहे, असेही भागवत म्हणाले.

अनेकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिल्याचे सांगतांना भागवत यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची आठवण काढली. आडवाणी आज घरातून हा सोहळा पाहत असतील, अनेक लोक आज उपस्थित नाहीत. संपूर्ण देशात आनंदाची लहर आहे. मात्र सर्वात मोठा आनंद आहे भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची आवश्यकता होती त्याचे अधिष्ठान बनण्याची आज सुरुवात झाली. आनंदात स्फुरण आहे. प्रेरणा आहे, असे भागवत म्हणाले. मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘विश्वात सर्वाधिक सज्जनतेचा व्यवहार होत आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे अधिष्ठान आज अयोध्येत बनत आहे. परमवैभव संपन्न आणि सर्वांचे कल्याण करण्याचा शुभारंभ आज होत आहे. आता येथे भव्य मंदिर उभे राहील. ज्यांना जी जबाबदारी दिली ती पार पाडली जाईल. मंदिर निर्माण होण्यापूर्वी आता आमच्या मनात आम्हाला अयोध्या उभारायची आहे. सर्वांची उन्नती करणारा, सर्वांना आपले मानणारा धर्म, आणि जगातील सर्वांना सुखशांती देणारा भारत आम्हाला उभा करायचा आहे.’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!