भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमुक्ताईनगरराजकीय

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या प्रगतीची चाके जलद गतीने फिरत आहेत !

मुक्ताईनगर । नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे उप जिल्हा रुग्णालय आणि संजिवनी हॉस्पिटल मुक्ताईनगर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाप्रसंगी बोलतांना पंतप्रधान मोदीं यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतीची चाके जलद गतीने फिरत आहेत आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले. सिव्हिल सर्जन डॉ. एन. एस. चव्हाण यांचा आणि इतर डॉक्टर यांचा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्षा असलेल्या संवेदना फाउंडेशनतर्फे कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. माजी महसुल कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गरीब आदिवासी पावरी बांधवांना ब्लॅंकेट आणि शाल वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करत आहे. मोदीजी यांनी मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. जिथे प्रत्येक भारतीय त्याच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने मोदीजी सर्वाधिक प्रेरित करीत आहेत. नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांना लोकांमध्ये राहायला, त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आणि त्यांची दु:खं दूर करण्यात समाधान मिळते. मोदीजी व्यक्ती, साहस, करूणा आणि विश्वासाची साकार मूर्ती आहे. भारताचे नवनिर्माण करण्याच्या तसेच त्याला जगासाठी दीपस्तंभ बनवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सदैव कार्यरत असतात

याप्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती विलास धायडे, सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सरपंच प्रविण पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट, डॉ. प्रदीप पाटील, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, अनिल पाटील, दिपक साळुंखे, निलेश मालवेकर, शिवराज पाटील, भैय्या पाटील, गौरव बाभुलकर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!