वर्ष प्रतिपदे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुऱ्हा येथे पथसंचलन
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,अक्षय काठोके |नवीन वर्षाचा पहिला उत्सव म्हणजे वर्ष प्रतिपदा. गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुक्ताईनगर तालुक्याचा पहिला उत्सव कुऱ्हा तालुका मुक्ताईनगर येथे सकाळी आठ वाजता पथसंचलन काढून मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवास तालुक्यातील 350 स्वयंसेवक उपस्थित होते. यात गणवेश धारी 300 व मंगल वेशात पन्नास स्वयंसेवक सहभागी होते. कुऱ्हा येथे संपन्न झालेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पथ संचलनामध्ये सुरुवातीला दंडधारी स्वयंसेवक, घोष, ध्वज, गणवेश धारी स्वयंसेवक व मंगल वेशातील स्वयंसेवक अशी रचना लावण्यात आली होती.

उत्सवास प्रमुख पाहुणे मुक्ताईनगर येथील डॉक्टर गजेंद्र पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह चंद्रशेखर पाटील तर जिल्हा बौद्धिक प्रमुख चंद्रकांत राऊत उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ गजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले,तर प्रमुख वक्ते चंद्रशेखर पाटील यांनी भारताच्या सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या इतिहासाबाबत विविध घटनांची उदाहरणासह माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघास या वर्षी दसऱ्याला संघस्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आगामी काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल याबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये संघाच्या विभाग, जिल्हा व तालुक्यातील नवीन वर्षाच्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली .तालुक्यातील योगेश नेटके यांची जिल्हा योग प्रमूख तर गजानन चौधरी यांची जिल्हा समरसता सह संयोजक म्हणून नियुक्तीची तर मुक्ताईनगर तालुका संघ चालक म्हणून डॉ. मनोज महाजन ,तालुका कार्यवाह म्हणून ज्ञानेश्वर न्हावकर, तालुका सहकार्यवाह म्हणून राजेश पाटील, शारीरिक प्रमुख म्हणून कुणाल सोनार, शारीरिक सहप्रमुख म्हणून रोहित धनगर ,बौद्धिक प्रमुख म्हणून श्रीकांत अरगडे, सह बौद्धिक प्रमुख म्हणून मोहन मुळे, कार्यकारिणी सदस्य म्हणून गोपाळ चौधरी, कार्यालय प्रमुख दिपक ठाकरे, महाविद्यालयीन प्रमुख म्हणून आदित्य नाईक, व्यवस्था प्रमुख म्हणून राहुल जावरे यासह उपखंड व मंडल प्रमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. उत्सव अगदी संघाच्या शिस्तीप्रमाणे शांततेत पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुऱ्हा उपखंडातील सर्व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.