“स्वनियमन,स्वअनुषासन आणि स्वनियंत्र्रण मूल्यनिष्ठ पत्रकारितेची त्रीसूत्री”- डॉ.सोमनाथ वडनेरे
मूल्यनिष्ठ पत्रकारिता: काल, आज आणि उदया विषयावर कार्यशाळा
सावदा,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l माध्यमांमध्ये मध्ये नित्य नवीन प्रवाह येत आहेत, नवीन आयाम स्थापित होत आहेत, अशा परिस्थितीत मूल्यनिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारिता करण्यासाठी मीडियामध्ये स्वनियमन, स्वअनुशासन आणि स्वनियंत्रण या त्रीसूत्रीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डाॅ सोमनाथ वडनेरे यांनी केल.
ब्रहमाकुमारीतर्फे ‘मूल्यनिष्ठ पत्रकारिता: काल, आज आणि उदया‘ विषयावर मीडिया कार्यषाळा घेण्यात आली, मुख्य संबोधन ब्रहमाकुमारीज महाराष्ट्र् मीडिया प्रमुख, माउंट आबूचे डाॅ सोमनाथ वडनेरे, जळगाव यांचे होते, आपल्या संबोधनात ते पुढे म्हणाले की, पत्रकारिता पूर्वी जे मिशन म्हणून कार्य करीत होती ती आज प्रोफेशन अर्थात व्यावसायिक झालेली असून, मीडियाने उदयोगाचे स्वरूप धारण केलेले आहे, कालपरत्वे त्यात स्थित्यंतरे होणे स्वाभाविक असले तरी माध्यमांनी मूल्यांची कास धरून पत्रकारिता करावी तरच लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत बनेल व सर्वसामन्य जनतेचा आवाज म्हणून काम करेल असा आशावादही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला
या प्रसंगी भानुदास भारंबे, प्रविण पाटील, चंद्रषेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, कैलास लवंगडे, संतोष नवले, महेंद्र पाटील, शाम पाटील, पंकज पाटील, योगेष सैतवाल, जगदिष चैधरी, रवी महाजन, कमलाकर माळी,युसुफ शहा,फरीद शेख,प्रदीप कुलकर्णी,,मिलींद कोरे, राजेष चैधरी, दिपक श्रावगे, मिलिंद टोके यांच्या सहीत अनेक माध्यम प्रतिनिधींचे सहकार्य लाभले
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त सावदा येथे विविध वर्गासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील शासकीय विश्राम गृहासमोरील शिवस्मृती भवनात मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले,
सुरूवातीस केंद्र संचालिका ब्रहमाकुमारी वैषालीदीदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आभार ब्र कु विकास फेगडे यांने केले सूत्रसंचलन ब्र कु दिपमाला यांनी केले
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा