विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !
Monday To Monday NewsNetwork।
रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्या च्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या विवरे बु॥ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सत्ताधारी गट प्रमुख वासुदेव नरवाडे व विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्यात वर्चस्वा साठी जिकरीची ठरली. यात वासुदेव नरवाडे गटाने बाजी मारत वर्चस्व सिद्ध केले. तर विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्या गटाला सुरूंग लावल्याने भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे दोन सदस्यांनी गटप्रमुखांच्या निष्क्रीयतेला रामराम ठोकल्याने पानिपत झाले. वासुदेव नरवाडे गटात १५पैकी ९ सदस्य आल्याने वर्चस्व कायम राहिले. तर विरोधी गटाला खिंडार पाडून रामराम ठोकत विनोद मोरे हे वासुदेव नरवाडे गटात सामील झाले.
१२ फेबुवारी रोजी उपसरपंच निलीमा सणंसे यांची निवड होवून २३ एप्रील रोजी राजीनामा दिल्याने मंजूर करण्यात आला होता. या रिक्त उपसरपंच पदासाठी ६ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांनी विरोधी गटाला सुरूंग लावल्याने सौ भाग्यश्री विकास पाटिल उपसरपंच झाल्या. परंतु विरोधकांनी गोंधळ घालून व दबाव टाकून लगेच दोन दिवसात ८ मे रोजी राजीनामा सरपंचां समोर ठेवला. त्या राजीनाम्याच्या पडताळणी साठी ३१ मे रोजी मासिक सभा घेण्यात आली. हि मासिक बैठक कोरम अभावी तहकुब करण्यात आल्याने २ जुन रोजी विशेष बैठक सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत ८ मे रोजी दिलेला राजीनामा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावापोटी भितीने दिला असल्याने मंजूर करण्यात येवू नये. असे उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल यांनी लेखी पत्राद्वारे सांगितल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा नाकारण्यात आला पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे विनोद मोरे हे सुद्धा विरोधकांना सोड चिठ्ठी देवून नरवाडे गटात सामील झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ देवून सदस्या श्रीमती रेखा गाढे यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच युनुस तडवी, वासुदेव नरवाडे , युसुफ खाटीक, रेखा गाढे , सौ स्नेहा पाचपांडे , नौशादबी इस्माईल खा , विनोद मोरे , सौ ज्योती सपकाळ, इस्माईल खा इब्राहिम खा, विकास पाटिल , भागवत महाजन , गणेश सपकाळ , यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
……………………………………..
८ मे रोजी माझे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावा पोटी व भितीने राजीनामा दिला होता. आज रोजी माझे मानसिक स्वास्थ ठिक असल्याने माझा राजीनामा मंजूर करण्यात येवू नये. असा अर्ज मासिक बैठकीत दिल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. विरोधी गटाने याचा चांगलाच धसका घेतला.
सौ भाग्यश्री विकास पाटिल
नवनिर्वाचित उपसरपंच, विवरे बु॥
…………………………………..
निवडून आल्यानंतर चार महिन्या पासुन ग्रामपंचायतीत कार्यरत झालो. परंतु गावाची कामे होत नव्हती. म्हणून विपीन राणे व शिवाजी पाटिल या विरोधी गटाला सोड चिठ्ठी देवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे गटात सामील झालो. मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करून वार्डाचा विकास करणार आहे.
विनोद मोरे,
ग्रा प सदस्य विवरे
…………………………………….
जातीपातीचे राजकारण न करता सर्वांची कामे करतो. तसेच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो. असा गावातील जनतेचा माझ्यावर आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये. असा सतत प्रयत्न असतो. माझ्या पॅनल मध्ये ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्वच जाती , समाजाचे नेतृत्व करणारे सदस्य आहे. यात मुस्लीम ,माळी , लेवा पाटिल , मराठा , तडवी , बौद्ध ,खाटिक , या समाजाचे सदस्य माझ्या सोबत आहे. भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे विरोधकांच्या निष्क्रीयतेला कंटाळून माझ्या सोबत काम करण्यासाठी गटात सहभागी झाले आहे.सर्वांना सोबत,व विश्वासात घेवून राजकारणापेक्षा समाजकारणा वर भर देवून गावाच्या सर्वांगिण विकासाचे काम करणार यात शंका नाही.
वासुदेव नरवाडे
सत्ताधारी पॅनल प्रमुख,
विवरे बु॥ ग्रा.प.