ऐनपुर येथील आठवड़े बाजार जवळ असलेल्या पाण्याच्या कुंडाकड़े प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर ता.रावेर (प्रतिनिधी)। ऐनपुर येथे बस स्टैंड जवळच असलेल्या निंबोल रोड वरील आठवड़े बाजारला लागुण शासकीय निधीतुन काही वर्षा आधी पाण्याची आवश्यकता बघून पाण्याचे कुंड शासकीय निधीतुन मंजूर बांधण्यात आले होते तेव्हापासून या कुंडाच्या पाण्याचा उपयोग सर्व नागरिक सार्वजनिकरित्या करत आहेत तसेच गुरे-ढोरं ही आपली तहान याच कुण्डावरुन भागवतात एवढेच नाही तर दर शनिवारी गावचे आठवड़े बाजार भरतो व बरेच से बाजारातील विक्रेते तसेच बाजारात ये-जा करणारे याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी करतात परन्तु सद्या या कुंडाकड़े प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
या कुंडाच्या 5 ते 6 फुट आजुबाजुला पीसीसी करण्यात आली होती,छोटीशी गटार/नाली ही केली होती परन्तु ठीकठिकाणी त्या पीसीसी वर खड्डे होऊन सुद्धा काही ठिकाणी पूर्ण चिखल साचलेला दिसून येत आहे, त्या ठिकाणी सर्व घाण आहे व दुर्गंध येतो कुंड पाण्याने भरलेला असतांना सुद्धा कारण नसतांना पाणी वाया जातांना दिसुन येते.
तसेच पुढे उन्हाळा येत असून पाण्याचे महत्व प्रशासनाने जाणून या पाण्याच्या कुंडाकडे लक्ष् देने गरजेचे आहे तसेच या पाण्याच्या कुंडाची देखभाल व दुरुस्ती करने ही गरजेचे आहे अन्यथा पाण्याची टंचाई ही नागरिकांना उन्हाळयात येण्याची दाट शक्यता आहे तरी पुढे पाण्याची टंचाई भासु नये तसेच त्या ठिकाणी अस्वछता राहु नये यासाठी प्रशासनाने आता तरी या पाण्याच्या कुंडाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे राम भरोसे सोडून देने कसे चालणार तरी या पाण्याच्या कुंडाकड़े लक्ष देऊन देखभाल व दुरुस्ती केली जाइल का असा प्रश्न निर्माण होत आहे.