रावेर रेल्वे स्टेशनवर ट्रेनचा धक्का लागून १७ वर्षीय तरुणांचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मूलाला रेल्वेस्टेशनवर ट्रेनचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील शिवाजी चौक येथील रहिवासी लोकेश सजंय महाजन,वय १७ वर्षे, हा सकाळ पासुनच घरातून निघुन गेला होता. त्याच्या नातेवाईकांनी व कुटुंबियांनी त्याचा शोधा शोध केला असता त्याचा मृतदेह दुपारी बारा वाजेच्या सुमारास रावेर रेल्वे स्टेशन नजिक रेल्वे रुळाजवळ सापडला. कोणत्या तरी ट्रेनची धडक लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून तो दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. या बाबत रावेर पोलिस स्टेशनला या बाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.