ब्रेकिंग : रावेर शौचालय घोटाळ्यात पुन्हा २ जणांना अटक !
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील पंचायत समितीत झालेल्या सुमारे दीड कोटीच्या वर रूपयांच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळ्यात अटक सत्रास सुरवात करत काल रात्री ४ जणांना अटक करण्यात आली होती आता याप्रकरणी आज पहाटे पावणे तीन च्या सुमारास पुन्हा दोन जणांना घरातून रावेर पोलीसांनी अटक केल्याने पंचायत समितीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
- संघटनात्मक निवडी जाहीर होण्याआधीच, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वेदना कधी ओळखणार ? ….तर पक्ष आणि नेत्याचं भवितव्य संकटात येईल ! आशयाची पेपर कटिंग कार्यकर्त्यांकडून तुफान केली जातेय शेयर
- मोठी बातमी : जीर्ण झाडाच्या नावाखाली हिरव्या डोलेदार झाडाची कत्तल, अधिकाऱ्यांनी दिली अजब परवानगी
- यावल तालुक्यातील तरुणाची जळगाव मध्ये गळफास घेऊन आत्महत्या
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत रावेर पंचायत समितीत तब्बल दीड कोटीच्या वर भ्रष्टाचार झाल्याने अडीच महीन्यापूर्वी दोन जणांन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल रात्री उशिरा रावेर पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, बाबुराव संपत पाटील (रा विवरे बु), रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी (रा पाडळा बु) यांना अटक करण्याची आली होती तोवर आज पहाटे पुन्हा पाडळा येथून रुबाब नवाद तडवी, हमीद महेमुद तडवी यांना पाडळा येथून अटक केल्याने अपहाराला हातभार लावणार्यां अनेकांचे धाबे दणाणले आहे.
रावेर शौचालय योजनेत भ्रष्ट्राचार प्रकरणातील अटक सत्रात गेल्या चोवीस तासांत रात्री चार तर पहाटे दोन अश्या ६ जणांना अटक केल्याने पंचायत समितीच्या गोटात भयान शांतता पाहायला मिळत असून लहान माशांबरोबर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणाचे धागे दोरे दूरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातमी : ब्रेकिंग : रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळ्यात लेखाधिकार्यांसह चौघांना अटक !