खिर्डी येथे आणखी ३ कोंबड्या मृत; मंडे टू मंडे च्या दणक्या नंतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतले सॅम्पल
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): सध्या खिर्डी खु.या गावात गेल्या पाच ते सहा दिवसात अचानक पणे कोंबड्या मरत असल्याने पक्षी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोंबड्यांना विषबाधा झाली, का वातावरणातील बदला मुळे मरत आहेत, की काय ? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
सकाळच्या वेळेस रस्त्याच्या कडेला उघड्यावर आज सुध्दा १ कोंबडी व २ लहान पिल्ले फेकल्याचे आढळून आले.आता ही मृत कोंबड्याची संख्या जवळ पास १५ च्या आसपास वाढली आहे परंतु अद्यापही नेमके कारण न समजू शकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल याबाबत मंडे टू मंडे वृत्त प्रसिद्ध केले होते… दरम्यान, पशू वैद्यकीय अधिकारी यांनी आज मरण पावलेल्या कोंबड्याची पाहणी करून मृत कोंबडीचे सँपल सोबत नेण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पशू वैद्यकीय अधिकारी यांनी पशू पालकांना सूचना देत शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांची विल्हेवाट लावणे अत्यंत महत्वाचे असून यापुढे नागरिकांनी आपल्या कोंबड्या मरण पावल्यास पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे