चराईसाठी गेलेल्या गाईला बिबट्याने केली फस्त,पाडळे खानापूर परिसरात भीतीचे वातावरण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील खानापूर जवळील पाडळे खुर्द येथील शिवारात काल संध्याकाळी चराई साठी गेलेल्या गाईला बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडल्यामुळे पाडळे खुर्द परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,रावेर तालुक्यातील पाडळे खुर्द येथील शेती शिवारात चराईसाठी गेलेल्या गाईला बिबट्याने फस्त केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. पाडळे येथील रहिवासी हबीब तडवी यांची पाळीव गाय जंगलात चराईसाठी गेली असता यावेळी सायंकाळी बिबट्याने अचानक हल्ला करून गाय फस्त केली असून पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट असल्याचे सांगण्यात आले आहे.यापूर्वी या भागात एक कुत्रा व शेळीवर देखिल असाच् हल्ला करून फस्त केली होती.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वनपाल अतुल तायडे पाडळे खुर्द येथे रवाना झाले आहे.दरम्यान, आधीच रावेरात हिंस्त्र प्राण्याचा धुमाकुळ वनविभागा कडून थांबता-थांबत नसतांना आता पाडळे खुर्द येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरु झाला आहे.त्यामुळे वन विभागा कडून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.