निर्दयीपणे गुरे कोंबून अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मध्यप्रदेशातून येणाऱ्या गुरांना निर्दयीपणे कोंबून विनापरवाना वाहतूक करणारा ट्रक पाल पोलीसांनी पकडला दोन जणांना ताब्यात घेतले असून गुरांची सुटका करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातुन महाराष्ट्रात येणाऱ्या गुरांना निर्दयीपणे कोंबुन अवैध वाहतूक करणारा ट्रक क्र.एमपी १७ एचएच १८०३ शेरी नाकामार्गे ५० गुरांना कत्तलीसाठी घेऊन जात होता. ही माहिती मिळताच पाल पोलिस चौकीचे पॉहेकॉ राजेंद्र राठोर, पो.कॉ. नरेंद्र बाविस्कर, दिपक ठाकुर, पो ना अतुल तडवी, पो. कॉ. संदीप धनगर यांनी सापळा रचून ट्रक आडविला ४५ गुरांची सुटका करणयत आली चार गुरे मयत झाली होती. हा ट्रक औरंगाबाद येथे कत्तलीच्या फॅक्टरीत जात होता.
ट्रकचालक नसीम खान अकबर खान (वय २७) , झुबेर खान रफीक खान (वय २१) (रा करमेळी जि. विदिशा मध्यप्रदेश) या दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुरांना जळगावच्या बाफना गॊ शाळेत रवाना करण्यात येणार आहे. मध्यप्रदेशकडून मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची तस्करी होते. याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमीनी केली आहे.