ऐनपूर-कोळदा रस्त्याबाबत, पालकमंत्र्यांच्या आदेशाला ठेकेदाराचा खो.रास्ता जैसे थे.
Monday To Monday NewsNetwork।
ऐनपुर ता रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील ऐनपुर-कोळदा रस्त्याची दुरावस्था झालेली असून हा रास्ता मंजूर झाला असून अद्यापही या रस्त्याची ‘जैसे थे’ ची परिस्थिति आहे.
तापी काठच्या 27 गावांमधे चक्रीवादळने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले त्यांच्या पाहाणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे पाहणी दौऱ्या साठी आले असता त्या वेळी ऐनपुर ते कोळदा या भागाची पाहणी केली त्या वेळी त्यांनी या रस्त्याच्या ठेकेदाराला फोन लावले असता हा रस्ता मंजूर असून याचे काम थांबता कामा नये दोन दिवसात या ठिकाणी मटेरियल टाकले गेले पाहिजे,असे सांगत त्यांनी ठेकेदाराला सुनावले होते परन्तु आज 13 ते 14 दिवस उलटुन ही या रस्त्याची जैसे थे ची अवस्था आहे सदर रस्त्यावर खडीही टाकण्यात आलेली आहे परन्तु काम कधी सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यात असून पालकमंत्र्याच्या आदेशाला ठेकेदाराने खो दिल्याचे बोलले जात आहे.