जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्याने बापाच्या डोक्यात खाटचा माचा मारून खुन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, प्रतिनीधी : तालुक्यातील पाल येथे जेवणात उडदाची डाळ व भाकरी केल्याचा राग आल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यात खाटेच्या माचल्याचा दांडका डोक्यात मारून खुन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.
रावेर तालुक्यातील पाल शिवार गट नं. २७१ शेती परिसरात दि २९ नोव्हें वार सोमवार दुपारी ४ वाजेच्या दरम्यान आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला वय २६ वर्ष यास त्यांच्याच वडील अनाज्या भारत्या बारेला वय ७५ यांनी जेवण करून घे असे सांगीतले असता काय स्वयंपाक आहे ही आरोपीने विचारणा केली त्यावर त्याच्या वडीलांनी उडीदाची डाळ व भाकर आहे असे सांगीतले त्यावरून त्यास संताप येवुन आपल्या बापास खाटच्या लाकडी पाया दाडक्यानेच प्रहार करीत डोक्यात, तोंडावर मारहाण केली त्यात त्यांचा जबर जखमी होवुन मुत्यू झाला अशी तक्रार दि 30 ला साडेबारा वाजता बनाबाई नरसिंग बारेला वय ३२ त्याच शिवारात राहणाऱ्या महीलेने दिली असता रावेर पोलीसांनी आरोपी शिवा उर्फ दिनेश यास शिरवेल महादेव हया भागातील भगवान पुरा जिल्हा खरगोन येथुन अटक केली त्यांच्यावर कलम ३०२ , ३२३ व ५०४ प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन घटनास्थळी श्री विवेक लावंड SD PO मुक्ताईनगर व प्रभारी फैजपुर भाग, श्री शितल कुमार नाईक स . पो नि . रावेर पोलीस स्टेशन, मनोहर जाधव PSI , यांनी घटना स्थळी भेट दिली पुढील तपास PSI सचीन नवले करीत आहे