भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेर

रावेर तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती !

रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासकांची नियुक्ती केल्याची माहिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली .

या बाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर आज शासनाकडून शासकीय प्रशासक नेमण्यात आहे. यामध्ये खानपुर डी. आर. महाजन, रेंभोटा एस. जे. दहजे, रसलपुर अतुल लहासे, पुनखेडा मिनाक्षी शिंदे, भोकरी डी.आर. महाजन, वाघोड व अजनाड एन.के. ढेरंगे, पाडळे खु व निरुळ सोनल तडवी, खिरोदा प्र प्रशांत खाचणे, बक्षीपुर अतुल लहासे, केऱ्‍हाळे खु प्रशांत खाचने, खिर्डी खु जी.एम. खेकारे, कोळोदा शितल पाटील, उदळी खु डी.एच. सोनवणे, निंबोल एच.एन. तडवी, कोचुर बु सरीता दळमळ, मांगलवाडी व्ही.पी. पवार, सिंदखेडा डी.बी.सदांशु, ऐनपुर एल.ए. पाटील, मुंजलवाडी डी.बी.सदांशु, तामसवाडी एस.एम. राठोर, तांदलवाडी व्ही.पी. पवार, वघाडी एस.जे. वडजे, मस्कावद बु जागृती तायडे, गौरखेडा सरीता डळमल, सुदगाव किशोर पाटील, केऱ्हाळा बु एच.एन. तडवी, दसणुर डी.एच.सोनवणे, भोर एस.एम. राठोड, विवरे बु एस डी दखने, मोरगांव खु पि एम पाटील वडगाव डी बी सदांशु विवरे खु एस डी दखने,धामोडी मिनल महाजन,तासखेडा आसाराम बारेला, रमजीपुर मीनाक्षी शिंदे, रायपुर किशोर पाटील, निंभोरा बु जी.एम. खकारे, पूरी सुग्रावी तडवी, मोरगाव बुपी.एम. पाटील, सुलवाडी शितल पाटील, गहुखेडा आसाराम बारेला, कर्जोत हापीजा तडवी, आहेरवाडी एच एन तडवी, उदळी जागृती तायडे या प्रमाणे या गावांवर शासनाने शासकीय प्रशासक शासनाच्या आलेल्या आदेशानुसार आज नेमणूक झाल्याचे जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!