रावेर आगारात निलंबन केलेल्या वाहकाचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न !
रावेर, प्रतिनीधी : रावेर आगारातील एस. टी.कर्मचारी राहुल वाघ यास संप काळात निलंबीत करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी या कर्मचाऱ्याने रावेर स्थानकातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली.
रावेर एस टी आगारामध्ये वाहक ( कंडक्टर) याला निलंबित केल्यामुळे त्याच्या पत्नीने मानसिक ताण घेतल्या मुळे पत्नीचे तब्येत खराब आहे या परिस्थितीत आज दिनांक 9 / 12 /2021 रोजी रावेर बस आगारामध्ये वाहक राहुल विश्वनाथ कोळी वय 35 याने बस स्टॅड मध्येच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार सहकारी कर्मचारी यांच्या लक्षात आल्या नंतर लगेच बस स्टैंड मधील बस घेऊन रावेर ग्रामीण रुग्णालय इथे त्याला दाखल (ऍडमिट ) केले डॉक्टर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथे पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थीर असून सदर काही निलंबित कर्मचारी यांना निलंबन ची कारवाई होत असल्याने बरेच कर्मचारी दडपण मध्ये आहे या निलंबनात जंजाळ साहेबांचा मोठा हात असल्याचा सदरहून कर्मचारी वर्ग आरोप करीत आहे एक बाय पास झालेल्या कर्मचाऱ्याला ही निलंबित केल्याचे माहिती मिळत आहे व आता सध्या सर्व कर्मचारी व त्यांचे परिवार मानसिक तणावात दिसत असून रावेर मध्ये झालेली घटना ही राज्यातील प्रत्येक डेपोमध्ये होऊ शकते अशी परिस्थिती दिसत आहे.