रावेरसामाजिक

खिर्डी शिवारातील शेत रस्त्यांची बिकट अवस्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। तालुक्यातील खिर्डी खु.या गावापासून जुना चांगदेव रस्ता जात असतो.या रस्त्यावर अनेक लहान मोठे शेतकरी बांधव आपली उत्पादित केळी,कापूस,सोयाबीन,शेतीमाल तसेच रासायनिक खतांची ने आण करण्यासाठी ट्रॅक्टर व बैलगाडीचा वापर करतात.

परंतु चिखलमय रस्त्यांची बिकट अवस्था असताना या रस्त्याने पायी चालणे जिक्रीचे ठरत असते.तसेच शेतीमालाने भरलेल्या बैलगाडीचे चाक चिखलात रुतल्यास शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून बैलांच्या पायाला इजा होत असल्याने एक ते दीड लाख रुपये किमतीचे बैल बे कामी होत असून शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत असतो.तसेच रस्त्याचे खडीकरण मंजूर असूनही अद्यापही प्रत्यक्ष रित्या कामाला सुरवात झाली नाही.यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.आज पर्यंत फक्त लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिली आहेत काम मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या रस्त्याची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती उद्भवली असून याकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाने त्वरित लक्ष देवून रस्त्याचे खडीकरण करण्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!