भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

काश्मिर घाटीतील नृशंस हत्येचा निषेध करत बजरंग दलाचे देशव्यापी आंदोलन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ९ आक्टोंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्र सरकारकडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की आतंकवादाचा पूर्णतया विनाश करण्याकरिता न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.

हिंदूंच्या काश्मीर घाटीतील पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे.
हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या नृशंस हत्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिनांक ९ आँक्टोबर २०२१ रोजी देशभरात आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत. भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ,भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे. आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या वर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे अशी मागणी व आवाहन आम्ही करीत आहोत. बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे.
त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

भारत विषारी सापांची, नागांची फणी ठेचण्याची परंपरा विसरलेला नाही. त्यांचा बदोबस्त करणे आम्हाला माहिती आहे. आता भारताच्या हातूनच आतंकवादाचा समूळ नायनाट होईल व तो होईपर्यत आम्ही शांत बसणार नाही याकरीता आम्ही कृत संकल्पीत आहोत.संयोजक व अध्यक्ष बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!