भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये बायो डिझेलचा काळाबाजार,3 लाख 67 हजाराचा माल जप्त

Monday To Monday NewsNetwork।

रावेर (प्रतिनिधी)। रावेर ते बऱ्हाणपुर रोडवर गोपी ट्रान्सपोर्ट अँण्ड तोल काटा समोर, रावेर ,तसेच दि-21 रोजी फकीर वाडा भागात पाताळगंगा रोडवर आरोपी शेख शरीफ शेख मुस्लिम वय 30 व शे.फिरोज शे.मुस्लिम वय-27 दोन्ही रा. तिरुपती नगर रावेर ता रावेर याचे पत्री शेड (गोडाऊन ) मध्ये रावेर ता. रावेर दिनांक -22 रोजी 2,40,900/- रुपये किंमतीचा माल त्यात एक 70,000/- रुपये किंमतीची लाल रंगाची अँपे रिक्षा क्रमांक MH-12-FD-8194 असलेली त्यामध्ये 90,000/- रुपयाची एक amspa कंपनीचे बायो डिझेल विक्री करण्याचा पंप मशिन, 12,000/- रुपयाची एक SF SONIC JT- 150 R बँटरी, 68400/- रुपयाचे 950 लिटर राँकेल मिश्रीत बायोडिझेल 1000 लिटर मापाची प्लाँस्टीकची टाकीत, 500/- रु किं.चे एक बायो डिझेल लिहीलेले बोर्ड तसेच शे.फिरोज शे.मुस्लिम वय-27 याचे 1,26,360/- रुपये किंमतीच्या 7 प्लाँस्टीकच्या व 2 लोखंडी 200 लिटर मापाच्या टाक्या पैकी , 8 टाक्या पुर्ण भरलेल्या एक टाकी अर्धी भरलेली, एक 35 लिटर, एक 20 लिटर मापाची पुर्ण भरलेली असे एकुन 1755 लिटर राँकेल मिश्रीत बायो डिझेल मिळून आले.

दोन्ही ठिकाणी अवैधरित्या राँकेल मिश्रीत बायोडिझेल राँकेल मिश्रण करुन अवैध साठा करुन चालते फिरते बायोडिझेलचे पंप अँपेरिक्षा वाहनावर तयार करुन नमुद बायोडिझेल हे नावाजलेले कंपनीची डिझेल प्रमाणेच असे भासवुन जनतेच्या विश्वासघात करुन शासनाची व वाहतुकदार जनतेची फसवणुक केली दोन्ही आरोपी यांचे कब्जात अवैधरित्या विक्री व साठवणुक करतांना एकुन 2705 लिटर राँकेल मिश्रीत बायोडिझेल साहीत्य व साधनासह एकुन रुपये 3,67,260/- रुपयाचे मालासह मिळून आले अशी फिर्याद अतुल वाकोजी नागरगोजे वय-29, पुरवठा निरीक्षक तहसिल रावेर यांनी दिली सदरची कारवाई Dysp नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,API शितलकुमार नाईक,PSI मनोहर जाधव,PSI मनोज वाघमारे, पो ना नंदू महाजन,पो ना महेंद्र सुरवाडे,पो कॉ सचिन घुगे,पो कॉ प्रदीप सपकाळे,पो कॉ प्रमोद पाटील,पो कॉ सुकेश तडवी,पो कॉ महेश मोगरे,पो कॉ पुरुषोत्तम पाटील ASI राजेंद्र करोडपती,पो कॉ सुरेश मेढे,पो कॉ विशाल पाटील,पो कॉ मंदार पाटील,पो कॉ कुणाल पाटील,हे कॉ भागवत धांडे यांनी कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!