रावेर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबीर
रावेर (प्रतिनिधी)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रावेर येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पंत्रप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन जि प अध्यक्षा ना.रंजना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख प्रदेश किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मा.जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय धांडे, ता.अध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस सी. एस. पाटील व महेश चौधरी यांची उपस्थिती होती. तसेच महिला आघाडी अध्यक्ष रेखा बोंडे, माजी तालुका अध्यक्ष सुनील पाटील,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, रावेर बाजार समिती सभापत श्रीकांत महाजन, प. स. उपसभापती जुम्मा तडवी, जिप सदस्य कैलास सरोदे, माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष शिवाजी पाटील , संदीप सावळे, भास्कर महाजन, गोपाळ नेमाडे, प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, सेवा सप्ताह तालुका प्रमुख भुषण पाटील, शहर युवा अध्यक्ष अजिंक्य वाणी, नथ्थु धांडे, पुरोजीत चौधरी, सरपंच प्रमोद चौधरी, शुभम पाटील, नितीन पाटील , राजेंद्र पाटील, रोहन चरहाटे, शुभम मुर्हेकर, सागर भारंबे , बाळा आमोदकर , गणेश भोई , व भाजप व युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी गोळवलकर रक्तपिढीच्या टीमने रक्तसंकलन केले.