बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रकरणी सहा ग्रामसेवकावर गुन्हा
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : तालुक्यात अपंगात्वाचे बनावट दाखल देऊन काही ग्रामसेवकांनी सोयीस्कर ठिकाण बदली मिळविल्या प्रकरणी रावेर (Raver) न्यायालयात धाव घेतल्याने सहा ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- “मुक्ताई भवानी अभयारण्यात” नर बिबट्याचा मृत्यू
- रावेर तालुक्यातील चिनावल, निंभोरा, मस्कावद, ऐनपूर सह ४१ ग्रामपंचायतींवर “महिलाराज”
- यावल तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, नव्या नेतृत्वाला मिळणार संधी !
तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामसेवकानी आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी निंबोल येथील किशोर भिवा तायडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला होता. अहवालात शिवाजी सोनवणे यांची अँजिओप्लास्टी झालेली असताना त्यांनी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला तर उर्वरित पाच जणांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवालात नमूद केले होते.
न्यायालयाने सुनावणीत न्यायाधीश अनंत बाजड यांनी ग्रामसेवक शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्र कुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील सदर सहा ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.